जर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट, ब्लॉग किंवा व्यवसायासाठी एक प्रोफेशनल वेबसाइट सुरू करायचा विचार करत असाल, तर WordPress हा एक उत्तम पर्याय आहे. WordPress वापरणं खूप सोपं आहे, आणि त्यात हजारो थीम्स आणि प्लगिन्स मोफत उपलब्ध आहेत. यामुळे अगदी कोडिंग न येणाऱ्या लोकांनाही स्वतःची साईट तयार करणं शक्य होतं.
पण या हजारो थीम्समध्ये सर्वोत्तम कोणती, हे शोधणं थोडं कठीण काम आहे. काही थीम्स फक्त सुंदर दिसतात पण पेज लोड होण्यासाठी वेळ घेतात, तर काहींमध्ये हवा तसा लुक मिळत नाही. म्हणूनच आज आपण अशा काही टॉप फ्री WordPress थीम्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या लाइटवेट, फास्ट आणि प्रोफेशनल आहेत.
या सर्व थीम्स पूर्णपणे मोफत आहेत, पण त्या पाहता किंवा वापरता प्रीमियम वाटतात. तुम्ही ब्लॉग तयार करत असाल, बिझनेस वेबसाइट, ई-कॉमर्स स्टोअर किंवा मॅगझिन वेबसाइट. या यादीत प्रत्येकासाठी काहीतरी आहे. चला तर मग पाहूया टॉप 10 मोफत WordPress थीम्स.
1. Astra
Astra ही एक हलकी आणि अतिशय जलद लोड होणारी WordPress थीम आहे. ती माझ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे कारण तिचं डिझाईन साधं, सुंदर आणि युजर फ्रेंडली आहे. ही थीम तुमचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, पोर्टफोलिओ किंवा WooCommerce स्टोअर कोणत्याही साईटसाठी सहज काम करते.

ही थीम पूर्णपणे SEO अनुकूल आहे, म्हणजे तुमच्या वेबसाईटला गुगलमध्ये चांगलं रँक मिळवायला मदत होईल. ती Elementor, Beaver Builder, यांसारख्या पेज बिल्डर्ससोबत सहज वापरता येते. कोडिंगची गरज न पडता तुम्ही हवी तशी साईट तयार करू शकता. अशा प्रकारे Astra हे सुरुवात करणाऱ्यांसाठी आणि प्रो वापरकर्त्यांसाठी दोघांसाठीही एक जबरदस्त पर्याय आहे.
2. Zakra
Zakra ही एक आधुनिक आणि वेगाने लोड होणारी थीम आहे. तिचं डिझाईन खूप क्लीन आहे आणि ती बिझनेस, ब्लॉग, ई-कॉमर्स किंवा पोर्टफोलिओ साठी खूप चांगलं काम करते. ही थीम वापरून तुम्ही एका क्लिकने डेमो साइट इम्पोर्ट करून लगेच साईट डिझाईनला सुरुवात करू शकता.

Zakra मध्ये वर्डप्रेस कस्टमायझरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फॉन्ट, कलर, लेआउट आणि बरेच काही तुम्ही सहजपणे बदलू शकता. ही थीम पूर्णपणे मोबाइल-फ्रेंडली आहे आणि सर्च इंजिनसाठी ऑप्टिमायझ्ड आहे. त्यामुळे तुमच्या साईटचा परफॉर्मन्स आणि लुक दोन्ही उत्तम राहतो.
3. Kadence WP
Kadence WP ही एक प्रोफेशनल लुकिंग आणि डिझाईनला सोपी अशी WordPress थीम आहे. या थीमचा वापर करून तुम्ही कोणतीही वेबसाईट – बिझनेस, ब्लॉग, ई-कॉमर्स – सहज तयार करू शकता. यात आधीपासून तयार असलेल्या काही टेम्प्लेट्स आहेत ज्या एका क्लिकने इम्पोर्ट करून वापरता येतात.

या थीममध्ये हेडर आणि फूटर बिल्डर, कलर स्कीम्स, फॉन्ट्स आणि लेआउट्स बदलण्याचे अनेक पर्याय आहेत. ही Elementor आणि Beaver Builder यांसारख्या पेज बिल्डर्ससोबत सुसंगत आहे. त्यामुळे कोडिंग न करता तुम्ही हवी तशी साईट तयार करू शकता.
4. Customizr
Customizr ही एक क्लासिक, युजर फ्रेंडली WordPress थीम आहे जी छोट्या व्यवसाय, ब्लॉग्स आणि पोर्टफोलिओ साठी योग्य आहे. ही थीम वापरायला सोपी आहे आणि WordPress Live Customizer वापरून तुम्ही साईट रिअल टाइममध्ये डिझाईन करू शकता.

ही थीम पूर्णपणे रिस्पॉन्सिव्ह आहे आणि मोबाइल डिव्हाइसवरही नीट काम करते. यामध्ये तुमच्या साईटला आवश्यक असणाऱ्या सगळ्या बेसिक सुविधा आहेत – SEO सपोर्ट, WooCommerce साठी सपोर्ट, कस्टम विडजेट्स आणि ट्रान्सलेशन रेडी डिझाईन.
5. ColorMag
ColorMag ही खास न्यूज, मॅगझिन आणि ब्लॉग वेबसाईट्ससाठी डिझाइन केलेली थीम आहे. तिचं डिझाईन प्रेझेंटेबल आहे आणि मोठ्या प्रमाणात कंटेंट असलेल्या वेबसाईटसाठी उपयुक्त आहे.

या थीममध्ये विविध लेआउट्स, कॅटेगरी सेक्शन्स आणि कस्टम विडजेट्स उपलब्ध आहेत. ही WooCommerce साठी सुसंगत आहे, त्यामुळे तुम्ही वेबसाईटवर जाहिराती लावून किंवा प्रॉडक्ट विकून पैसे कमवू शकता.
6. MagazineX
MagazineX ही एक क्लीन आणि मॉडर्न WordPress थीम आहे जी विशेषतः मॅगझिन आणि न्यूज वेबसाईट्ससाठी बनवलेली आहे. तिचे ग्रिड आणि लिस्ट लेआउट्स वाचकांना कंटेंट व्यवस्थित पाहता यावा यासाठी उपयुक्त आहेत.

ही थीम WooCommerce ला सपोर्ट करते आणि SEO फ्रेंडली आहे. मोबाईल डिव्हाइससाठी ऑप्टिमायझ्ड असून, विविध सेक्शन्ससाठी कस्टम विडजेट्स देखील मिळतात. तुम्ही तुमचा ब्रँड कलर, लेआउट्स आणि साईट लुक सहज बदलू शकता.
7. MH Magazine Lite
MH Magazine Lite ही न्यूज, मॅगझिन आणि ब्लॉगसाठी खूपच चांगली मोफत थीम आहे. तिचं लेआउट व्यवस्थित आहे आणि यामध्ये कंटेंट सहजपणे व्यवस्थित दाखवता येतो.

यात तुम्हाला विविध सेक्शन्स मिळतात जसे की फीचर्ड पोस्ट्स, कॅटेगरी विडजेट्स, आणि सोशल मीडिया विडजेट्स. ही थीम मोबाईल-फ्रेंडली आहे आणि सर्च इंजिनसाठी अनुकूल आहे, त्यामुळे वेबसाईटच्या वाढीसाठी मदत होते.
8. Blocksy
Blocksy ही एक अत्याधुनिक आणि मॉडर्न WordPress थीम आहे. ही थीम Gutenberg एडिटरसोबत उत्तम प्रकारे काम करते, आणि ती Elementor, Brizy, Beaver Builder यांसारख्या बिल्डर्ससाठीही सुसंगत आहे.

यामध्ये तुम्हाला रेडीमेड डेमो साइट्स, हेडर-फूटर बिल्डर, आणि कलर/टायपोग्राफी सेटिंग्स मिळतात. वेबसाइटचा लुक प्रोफेशनल ठेवून परफॉर्मन्सही चांगला राहतो, म्हणून Blocksy हे सर्वांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
9. News Portal
News Portal ही मॅगझिन आणि न्यूज वेबसाईट्ससाठी खास बनवलेली एक सशक्त थीम आहे. तिचं डिझाईन क्लीन आणि आकर्षक आहे आणि तुम्ही विविध कलर कॉम्बिनेशन्स वापरून ती साईट ब्रँडसाठी साजेशी बनवू शकता.

ही थीम SEO फ्रेंडली आहे, मोबाईलसाठी तयार आहे आणि एका क्लिकने डेमो इम्पोर्ट करता येतो. प्लगिन्सशी सुसंगत असल्यामुळे तुम्हाला हव्या त्या सुविधा वेबसाईटमध्ये सहज जोडता येतात.
10. GeneratePress
GeneratePress ही एक अतिशय हलकी आणि वेगाने लोड होणारी WordPress थीम आहे. ती ब्लॉक एडिटर (Gutenberg) सोबत उत्तम प्रकारे काम करते आणि यामध्ये 60 पेक्षा जास्त कलर कंट्रोल्स, 5 साइडबार लेआउट्स आणि 9 विडजेट एरियाज आहेत.

ही थीम पूर्णपणे SEO अनुकूल आहे, WooCommerce सपोर्ट करते आणि बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे तुमची साईट कोणत्याही प्रकारच्या युजर्ससाठी सुलभ बनते आणि तुम्हाला सर्व आधुनिक फिचर्स मिळतात.
निष्कर्ष
वरील सर्व WordPress थीम्स मोफत असूनही दर्जेदार आहेत. या थीम्स वापरून तुम्ही कोणतीही वेबसाईट सुरु करू शकता. जर तुम्हाला अजून सुरुवात करायची असेल आणि बजेट कमी असेल, तर या फ्री थीम्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. योग्य थीम निवडा आणि तुमचं ऑनलाईन प्रोजेक्ट आजच सुरू करा!