तुम्ही “ब्लॉगिंग” हा शब्द तर ऐकलाच असेल. ब्लॉगिंग म्हणजे तुमची एक वेबसाइट बनवणे आणि त्यावर लेख लिहिणे. ब्लॉगिंग करून तुम्ही घरी बसल्या पैसे कमावू शकता. नोकरीची पण गरज नाही. पण ब्लॉग कसा बनवायचा?
मी एक ब्लॉगर आहे आणि या पोस्टमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा बनवायचा आणि पैसे कसे कमवायचे, हे सांगणार आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग एका दिवसातच सुरू करू शकता.
ब्लॉग सुरू करायचा असेल तर खालील पावलं अनुसरावी लागतील:
- एक चांगला विषय निवडा
- ब्लॉगचे नाव ठरवा
- डोमेन विकत घ्या
- वेब होस्टिंग विकत घ्या
- वर्डप्रेस इन्स्टॉल करा
- ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करा
- ब्लॉगचे मुद्रीकरण करा
चला तर मग हे सगळे टप्पे सविस्तर जाणून घेऊया.
1. ब्लॉग विषय (Niche) निवडणे
ब्लॉगचे जे विषय असतात, त्यांना निश (niche) म्हणतात. तुमचा ब्लॉग यशस्वी होणार की नाही, तुम्ही त्याच्यातून पैसे कमावणार की नाही, हे सगळं तुमच्या ब्लॉगच्या निशवर अवलंबून असते. जर तुम्ही असा निश निवडला जो लोक वाचत नाहीत, तुमचा ब्लॉग चालणार नाही.
तुम्हाला असा निश निवडायचा आहे जो लोकांना वाचायला आवडेल आणि त्याची मागणी पण राहणार. मी काही निशेस खाली दिले आहेत जे तुम्ही वापरून पाहू शकता.
- बातम्यांची वेबसाइट
- अर्थव्यवस्था
- आरोग्य
- डिजिटल मार्केटिंग
- सुविचार आणि शायरी
- सौंदर्य आणि फॅशन
- प्रवास
- शिक्षण
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तुम्ही त्याच्यावर पण ब्लॉग सुरू करू शकता. तुम्हाला जेवढे ज्ञान आहे, ते तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. तुम्हाला ब्लॉग पोस्ट लिहायला सोपे होणार.
2. ब्लॉगचे नाव ठरवणे
तुमचे नाव म्हणजे तुमची ओळख. तसेच तुमच्या ब्लॉगचे नाव ही ओळख आहे जी लोक लक्षात ठेवणार. म्हणून तुम्हाला असे नाव ठेवावे लागेल जे लोकांना आठवून राहणार.
खाली काही टिप्स दिले आहेत मी जे तुम्हाला अनुसरावे लागेल:
- नाव छोटे पाहिजे, जास्त लांब नको.
- नाव तुमच्या ब्लॉगच्या निशशी संबंधित पाहिजे.
- गोंधळात टाकणारे शब्द वापरू नका.
- तुमच्या ब्लॉग निशचा मुख्य कीवर्ड त्यात असला पाहिजे.
ब्लॉगचे नाव हे तुम्ही कोणत्याही भाषेत ठेवू शकता. जर तुम्ही मराठी ब्लॉग सुरू करत असणार तर नाव मराठीमध्ये ठेवा. इंग्रजीमध्ये असेल ब्लॉग तर इंग्रजी नाव ठेवा.
तुम्ही जर वैयक्तिक ब्लॉग बनवत असाल तर तुमचे नाव हेच तुमच्या ब्लॉगचे नाव ठेवू शकता. याच्यामुळे तुमची वैयक्तिक ब्रँडिंग बनते.
3. डोमेन नेम विकत घेणे
तुमच्या ब्लॉगचे नाव अंतिम झाल्यावर आता तुम्हाला डोमेन नेम विकत घ्यावा लागणार. डोमेन नेम म्हणजे तुमच्या ब्लॉगची लिंक. उदाहरणासाठी “marathiblogging.com” हा माझ्या या ब्लॉगचा डोमेन नेम आहे.
डोमेन नेम खूप प्रकारचे असतात – .com, .in, .net, .org. यामधून तुम्ही कोणतेही वापरू शकता. पण सर्वात चांगले आहे .com, कारण हे सगळ्या लोकांना माहित आहे. तुमचा ब्लॉग जर फक्त भारतासाठी असेल तर तुम्ही .in पण घेऊ शकता.
आता डोमेन नेम विकत कुठून घ्यायचा? खूप वेबसाइट्स आहेत जिथून तुम्ही डोमेन नेम घेऊ शकता. मी तुम्हाला रेकमेंड करणार बिगरॉक आणि होस्टिंगर. तुम्ही कोणाला पण विचारून बघा, ते हेच सांगणार कारण हे चांगले आहेत.
बिगरॉकवर तुम्हाला .com डोमेन ₹1,100 मध्ये पडणार एक वर्षासाठी. तसेच .in डोमेन ₹470 मध्ये येतो. होस्टिंगरवर .com पडणार ₹880 मध्ये आणि .in पडणार ₹500 मध्ये.
समजा तुम्ही होस्टिंगरकडून वेब होस्टिंग विकत घेतली तर तुम्हाला एक डोमेन नेम फुकट मिळतो. त्यावेळी वेगळे पैसे भरावे लागत नाहीत. कसे? वाचत राहा तुम्हाला सांगणार मी पुढे.
4. वेब होस्टिंग विकत घेणे
वेब होस्टिंग म्हणजे एक सर्व्हर जिथे तुमचा ब्लॉग होस्ट राहणार. तुमच्या ब्लॉगचे सर्व फाइल्स आणि फोल्डर्स वेब होस्टिंगवर असतात. प्रत्येक वेबसाइटला एक वेब होस्टिंग लागतेच.
वेब होस्टिंगचे पण खूप प्रकार आहेत आणि त्याचे दर पण वेगवेगळे आहेत. तुम्हाला इंटरनेटवर ₹100 ची पण होस्टिंग दिसेल आणि ₹10,000 ची पण. फरक एवढाच असतो की स्वस्त होस्टिंग वाला ब्लॉग कमी लोकांना हाताळू शकतो आणि महाग होस्टिंग वाला ब्लॉग जास्त लोकांना.
आता तुम्ही नवीन ब्लॉगर आहात तर तुमच्या ब्लॉगवर सुरुवातीला जास्त लोक येणार नाहीत. म्हणून तुम्ही स्वस्त पण मस्त, अशी वेब होस्टिंग विकत घेऊ शकता. अशा खूप कंपन्या आहेत ज्या बजेट वेब होस्टिंग देतात.
मी आणि सगळे भारतीय ब्लॉगर्स रेकमेंड करतात होस्टिंगरची वेब होस्टिंग. का? कारण होस्टिंगरमध्ये तुम्हाला कमी पैशांत चांगली सेवा भेटते आणि सपोर्ट पण जबरदस्त भेटतो. बाकीचे वेब होस्टिंग एवढे चांगले नाहीत.

आता होस्टिंगरमध्ये पण वेगवेगळे प्लॅन्स आहेत. सर्वात चांगला प्लॅन आहे “प्रीमियम” प्लॅन. यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी डोमेन नेम फुकट मिळतो. आणखी काही वैशिष्ट्ये आहेत ते खाली लिहिले आहे मी.
- 25 वेबसाइट्स होस्ट करू शकता
- 25 जीबी ची स्टोरेज आहे
- एआय वेबसाइट बिल्डर
- मोफत बॅकअप्स
- डीडोस संरक्षण
- आणखी खूप काही..
हा प्लॅन तुम्हाला ₹3,500 मध्ये पडणार एका वर्षासाठी, ₹5,000 दोन वर्षांसाठी आणि ₹8,400 चार वर्षांसाठी. म्हणजे ₹3,500 मध्ये तुम्हाला वेब होस्टिंग आणि डोमेन नेम मिळणार एका वर्षासाठी.
तुम्ही माझ्या ब्लॉगवर आले आहात म्हणून तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. खाली दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही वेब होस्टिंग विकत घेणार, तर तुम्हाला 10% अतिरिक्त सवलत मिळणार. म्हणजे तुम्हाला ₹3,500 ऐवजी ₹2,365 मध्ये पडणार.
विकत घेताना तुम्हाला “SIMPLYDIGITAL” हा कूपन कोड टाकायचा आहे. वेब होस्टिंग घेण्याच्या सगळ्या पायऱ्या दिल्या आहेत मी.
1. या लिंकवर क्लिक करून होस्टिंगरच्या वेबसाइटला जा. किंवा खालच्या बटन वर पण क्लिक करू शक्ता.
2. तिथे तुम्हाला “Premium” प्लॅन घ्यायचा आहे. “Choose Plan” वर क्लिक करा.

3. “Period” मध्ये “12 months” निवडा.

4. “Have a coupon code” वर क्लिक करा आणि “SIMPLYDIGITAL” हा कूपन कोड टाकून अप्लाय करा. Continue वर क्लिक करा.

5. आता तुमचा ईमेल एड्रेस आणि पासवर्ड टाका. पासवर्ड कोणताही वापरू शकता. हा पासवर्ड तुमच्या होस्टिंग अकाउंटचा असणार. मग रजिस्टरवर क्लिक करा.

6. आता तुमची पूर्ण माहिती भरा आणि पुढे जा (Continue वर क्लिक करा).

7. आता तुम्हाला पेमेंट करावे लागेल. तुम्ही यूपीआय किंवा डेबिट कार्डने पेमेंट करू शकता.

8. पेमेंट झाल्यावर तुमचे होस्टिंग अकाउंट एक्टिवेट होऊन जाईल.
9. नंतर तुम्हाला “Create Empty PHP Website” पर्याय निवडून तुमचा डोमेन नेम लिहायचा आहे जो तुम्हाला हवा आहे.
10. पुढे केल्यावर तुमचे होस्टिंगर डॅशबोर्ड उघडेल.
जर तुम्हाला असे वाटले की वेब होस्टिंगची गरज नाही तर तुम्ही तुमचे पैसे परत मागू शकता. होस्टिंगरची ३० दिवसांची रिफंड पॉलिसी आहे. तुमची होस्टिंग घेतल्याच्या 30 दिवसांच्या आत तुम्ही पैसे परत घेऊ शकता.
5. वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
वर्डप्रेस एक असे प्लॅटफॉर्म आहे जे सगळे आपले ब्लॉग बनवायला वापरतात. जगातले मोठे-मोठे कंपन्या पण वर्डप्रेस वापरतात कारण ते खूप प्रसिद्ध आहे आपल्या वैशिष्ट्यांसाठी.
वर्डप्रेसमध्ये तुम्हाला खूप सारे थीम्स, प्लगइन्स, आणि वैशिष्ट्ये मिळतात. हे सगळे वापरून तुम्ही सगळ्या प्रकारचे वेबसाइट्स बनवू शकता. चला तर मग पाहू की वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करायचे.
1. तुमच्या होस्टिंगरच्या अकाउंटमध्ये लॉगिन करा.
2. तिथे “Auto installer” च्या बटनवर क्लिक करा.

3. आता “WordPress” निवडा.

4. तुमच्या ब्लॉगचे नाव, ईमेल एड्रेस, आणि पासवर्ड टाका जो तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये लॉगिन करायला लागेल.

5. पुढे जा. तुमचे वर्डप्रेस इन्स्टॉल होऊन जाईल.
आता तुमच्या डोमेन नेमवर वर्डप्रेस इन्स्टॉल झाले आहे. वर्डप्रेस अॅडमिनमध्ये लॉगिन करण्यासाठी तुम्ही होस्टिंगरच्या डॅशबोर्डचा वापर करू शकता किंवा (example.com/wp-admin) या लिंकवर जाऊन लॉगिन करू शकता.
वर्डप्रेस एडमिन डॅशबोर्डमध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉगची थीम बदलू शकता, त्याला कस्टमाइज करू शकता. हे सगळं सोपं आहे म्हणून या विषयावर मी जास्त बोलणार नाहीये.
6. ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करणे
वरचे सगळे पावलं अनुसरल्यावर आता तुम्ही लेख लिहायला सुरुवात करू शकता. ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी पोस्ट्समध्ये जाऊन अॅड न्यू पोस्टवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमच्या पोस्टचा शीर्षक द्या आणि मजकूर लिहा.

एकदा पूर्ण पोस्ट लिहिल्यावर पब्लिश बटनवर क्लिक करा. तुमची पोस्ट ब्लॉगवर दिसणार आणि लोक ते वाचू शकतील. याच प्रकारे पोस्ट लिहित राहा. यालाच म्हणतात ब्लॉगिंग. इथपर्यंत पोहोचले तर समजून जा तुम्ही ब्लॉगिंग सुरू केली.
तुमच्या निश नुसार तुम्ही टॉपिक्स सिलेक्ट करा. गूगल वर सर्च करा, लोक काय शोधत आहेत ते बघा, आणि त्यावर तुम्ही पोस्ट्स लिहा. एकदम सिंपल भाषेत लिहा. खूप मोठं करून नका लिहू, आणि कोणी कॉपी पेस्ट केलेलं नको. तुमचं स्वतःचं लिहा.
पोस्ट लिहताना काही गोष्टी लक्षात ठेवा:
- टायटल आकर्षक ठेवा
- पोस्ट मध्ये हेडिंग्स वापरा (H1, H2, H3)
- एकदम सिंपल मराठीत लिहा
- महत्वाचे शब्द बोल्ड करा
- शेवटी वाचकाला काही विचारण्याचा प्रयत्न करा
जर पोस्ट्स चांगल्या असतील तर गूगल वर रँक होतील आणि लोक येतील वाचायला. मगच पुढचा स्टेप महत्वाचा होतो – पैसे कमवायचे.
7. ब्लॉग ला मॉनिटाइज करणं
आता ब्लॉगिंग तर सुरू केली तुम्ही पण पैसे कसे कमवायचे? ब्लॉगवरून पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत. चला ते सगळे आपण जाणून घेऊ.
1. गूगल अॅडसेन्स
गूगल अॅडसेन्स एक जाहिरात नेटवर्क आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दाखवून पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला अॅडसेन्सवर अप्लाय करून मान्यता घ्यावी लागते. असे आणखी जाहिरात नेटवर्क्स आहेत जे तुम्ही इथे पाहू शकता.
2. एफिलिएट मार्केटिंग
एफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला दुसऱ्या कंपनीचे उत्पादने प्रमोट करावे लागतात. जेव्हा कोणी तुमच्या एफिलिएट लिंकवरून ते उत्पादन विकत घेतात, तुम्हाला त्याचा कमिशन मिळतो. तुम्ही इंटरनेटवर शोधून एफिलिएट प्रोग्रॅम्स जॉइन करू शकता.
3. स्पॉन्सर्ड पोस्ट्स
तुम्ही ब्लॉगवर स्पॉन्सरशिप सुरू करू शकता. यामध्ये दुसरे लोक किंवा कंपन्या तुम्हाला त्यांचे ब्लॉग पोस्ट तुमच्या ब्लॉगवर प्रकाशित करायचे पैसे देतात. तुमचा ब्लॉगवर चांगला ट्रॅफिक असेल तर तुमची चांगली कमाई होणार.
शेवटचे शब्द
ब्लॉगिंग करणे एवढे सोपे नाही जेवढे लोक म्हणतात. ब्लॉगिंगमध्ये नवीन पोस्ट्स लिहावे लागतात, एसईओ करावा लागतो आणि सोशल मीडियावर शेअर करावे लागते. जेव्हा तुम्ही कष्ट घेणार, तेव्हा तुमचा ब्लॉग आणखी वाढणार.
समजा तुम्हाला काही अडचण आली किंवा काही शंका असली तर मला मेसेज करू शकता माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर. मला ईमेल पण पाठवू शकता [email protected] वर. तुम्ही ब्लॉगिंगमध्ये पुढे जावो हीच माझी इच्छा.