तुमच्या मनात असं प्रश्न असू शकतो – हे GPL थीम्स आणि प्लगिन्स खरंच सुरक्षित आहेत का? चला तर मग याबद्दल थोडक्यात समजून घेऊया.
जर तुम्ही नवीन ब्लॉगर असाल आणि कुणीतरी सांगितलं असेल की ब्लॉग जलद चालवण्यासाठी प्रीमियम थीम लागते, तर हे खरं नाही. मी स्वतः फ्री थीम वापरतो आणि तरीसुद्धा माझा ब्लॉग काही सेकंदांत लोड होतो.
इंटरनेटवर सर्च करताना तुम्ही पाहिलं असेल की काही वेबसाइट्स प्रीमियम WordPress थीम्स आणि प्लगिन्स फारच स्वस्तात देतात – काहीतरी Rs 200-300 मध्ये. ते सांगतात की त्यांनी मूळ डेव्हलपरकडून परवाना घेतलाय आणि कारण तो GPL (General Public License) अंतर्गत आहे, त्यामुळे ते कोणालाही विकू शकतात.
मग खरंच हे GPL थीम्स सुरक्षित आहेत का?
खरं सांगायचं झालं, तर नाही. अशा वेबसाइट्सवर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात की त्यांनी काहीच बदल केले नाहीत, पण हे खरंच आहे का हे कोणालाच माहीत नसतं.
त्यापेक्षा फ्री थीम्स वापरा, किंवा जर प्रीमियम थीम हवी असेल तर थेट मूळ डेव्हलपरकडूनच घ्या. त्यामुळे धोका टळतो आणि त्या डेव्हलपरलाही मदत होते.
काही लोक तुम्हाला अशा GPL साइट्सची शिफारस करतील. पण लक्षात ठेवा – हे लोक त्यातून पैसे कमावत असतात. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट असते – पैसा.
GPL थीम्स का टाळाव्यात?
- यात खतरनाक कोड्स किंवा स्क्रिप्ट्स असू शकतात – त्यामुळे वेबसाईट हॅक होऊ शकते.
- तुम्ही मूळ डेव्हलपरचा सन्मान करत नाही – त्याने मेहनत घेऊन ते बनवलंय.
- तुमच्या थीम्स/प्लगिन्सना ऑटो अपडेट्स मिळणार नाहीत.
- कोणतीही ग्राहक सेवा मिळणार नाही.
हे सगळं पाहता, GPL प्रॉडक्ट्स वापरणं म्हणजे धोका आहे.
Nulled Themes & Plugins म्हणजे काय?
हे GPL पेक्षा अजून वाईट. हे पूर्णपणे फुकट मिळतात, पण यामध्ये खूप वाईट कोड्स असतात. तुम्ही ते वापरलं, तर काय होऊ शकतं?
- वेबसाईट हॅक होऊ शकते
- अचानक जाहिराती दिसू शकतात
- तुमचा डेटा चोरी होऊ शकतो
- वेबसाईट क्रॅश होऊ शकते
जर तुमची वेबसाइट मोठ्या बिझनेससाठी असेल किंवा ई-कॉमर्स असेल, तर अशा प्रॉडक्ट्सचा वापर करणे खूप मोठा धोका आहे.
मग काय करावं?
सोपं उत्तर – जर प्रीमियम थीम खरेदी करायची ऐपत नसेल, तर चांगल्या फ्री थीम्स वापरा. WordPress वर खूप चांगल्या फ्री थीम्स आणि प्लगिन्स उपलब्ध आहेत – फिचर्सही चांगले असतात आणि मोफत सपोर्टही मिळतो.
SEO, सिक्युरिटी, कस्टमायझेशन, फंक्शनॅलिटी – कोणत्याही कामासाठी फ्री प्लगिन्स उपलब्ध आहेत.
निष्कर्ष
GPL प्रॉडक्ट्स वापरणं टाळा. जरी कुठली वेबसाइट सुरक्षित वाटली, तरी ती वापरणं तुमच्या जोखमीवर आहे. पण शिफारस हीच – अशा वेबसाइट्सपासून लांब रहा. ThemeForest सारख्या वेबसाइट्सवर तुम्हाला $10 पासून चांगल्या प्रीमियम थीम्स मिळू शकतात.
हा लेख माझा वैयक्तिक अनुभव आणि मत आहे. मी असं म्हणत नाही की सगळ्याच वेबसाइट्स बनावट आहेत. काही खरंच चांगल्या असतात. तुम्ही आधी स्टेजिंग (डेमो) साइटवर चेक करून बघू शकता. सगळं ठीक वाटलं, तरच मुख्य साईटवर वापरा.