ब्लॉगवर ट्रॅफिक कसे वाढवायचे? Bring Traffic on Blog in Marathi (2025)

जर तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू केला असेल आणि जास्त वाचक मिळवायचे असतील, तर फक्त पोस्ट लिहून थांबू नका. ब्लॉगवर ट्रॅफिक आणणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं चांगलं लिखाण करणं महत्त्वाचं आहे.

ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. काही मार्ग मोफत आहेत तर काहींसाठी थोडे पैसे खर्च करावे लागतात. सुरुवातीला शक्य तेवढे मोफत आणि सोपे उपाय वापरायला हवेत.

या पोस्टमध्ये मी तुम्हाला 15 सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर चांगला ट्रॅफिक आणू शकता. प्रत्येक मार्ग सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे, त्यामुळे सुरुवात करणं तुमच्यासाठी अजिबात कठीण जाणार नाही.

1. फेसबुकवर शेअर करा (Share on Facebook)

फेसबुकवर रोज करोडो लोक असतात. त्यामुळे ब्लॉग पोस्ट शेअर करायला फेसबुक हा एकदम बेस्ट पर्याय आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं फेसबुक पेज तयार करा आणि तिथे नियमितपणे ब्लॉग पोस्ट्स अपलोड करा.

facebook

तुमच्या ब्लॉग विषयाशी संबंधित ग्रुप्समध्येही जाऊन सामील व्हा आणि तिथे तुमच्या पोस्ट्स शेअर करा. यामुळे तुम्हाला भरपूर वाचक मिळू शकतात.

2. यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करा (Share Video on YouTube)

आजकाल लोक वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहायला जास्त वेळ देतात. यूट्यूबचे युजर्स दरवर्षी वाढत आहेत. म्हणून तुमच्या ब्लॉग पोस्ट्सचे व्हिडीओ बनवा आणि स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर टाका.

youtube channel

तुम्ही स्वतः बोलून व्हिडीओ तयार करू शकता किंवा AI वापरून प्रोफेशनल व्हिडीओ बनवू शकता. व्हिडीओमध्ये तुमचा ब्लॉग लिंकही द्या.

3. ईमेल लिस्ट तयार करा (Create an Email List)

गुगलचे कोर अपडेट्स आल्यावर बऱ्याच ब्लॉग्सचा ट्रॅफिक कमी होतो. म्हणून स्वतःची ईमेल लिस्ट असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ईमेल लिस्ट तयार केली तर वाचकांना नवीन पोस्ट्सबद्दल थेट मेलने माहिती देता येते.

newsletter

मेलचिम्प (Mailchimp), मेलरलाइट (Mailerlite) किंवा ब्रेवो (Brevo) वापरून ईमेल मार्केटिंग सुरू करू शकता. यामुळे वाचक तुमच्याशी कायम जोडलेले राहतील.

4. इंस्टाग्रामवर शेअर करा (Share on Instagram)

इंस्टाग्रामवर कोट्यवधी युजर्स दररोज असतात. जर तुमचा ब्लॉग प्रवास किंवा फोटोग्राफी सारख्या प्रतिमांशी संबंधित असेल, तर इन्स्टाग्राम पेज तयार करा आणि आकर्षक पोस्ट शेअर करा.

instagram app

सुंदर फोटो, इन्फोग्राफिक्स आणि स्टोरीज बनवा. फॉलोअर्ससोबत (followers) सतत संवाद साधा. तुमचं ऑडियन्स मजबूत झालं तर ब्लॉगवर चांगला ट्रॅफिक मिळतो.

5. पिंटरेस्टवर पिन्स तयार करा (Create Pins on Pinterest)

पिंटरेस्ट (Pinterest) हा फोटो आणि इन्फोग्राफिक्ससाठी एकदम परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. जर तुमच्या ब्लॉगवर बरेच फोटो आणि व्हिज्युअल कंटेंट असेल तर Pinterest वर पिन्स तयार करा.

Pinterest

तुमचा वेळ वचवायचे असेल तर तुम्ही AI पिन जनरेटर वापरून सुंदर पिन्स बनवू शकता. Pinterest वरून येणारा ट्रॅफिक खूप काळ टिकतो, म्हणून वेळ घालवणं फायदेशीर आहे.

6. X (Twitter) वर पोस्ट शेअर करा

जर तुमचा ब्लॉग बातम्या, घडामोडी किंवा ट्रेंडिंग विषयांवर असेल तर X (पूर्वीचं ट्विटर) वापरणं फायद्याचं आहे. ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून तुमची पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते.

x twitter

थोडक्यात शब्दांत चांगला मेसेज देऊन तुम्ही सहजपणे वाचकांचं लक्ष वेधू शकता आणि ब्लॉगवर चांगला ट्रॅफिक मिळवू शकता.

7. क्वोरा वर प्रश्नांची उत्तरं द्या (Answer Questions on Quora)

Quora ही एक प्रश्नोत्तरांची वेबसाईट आहे जिथे तुम्ही तुमच्या ब्लॉगशी संबंधित प्रश्नांना उत्तरं देऊ शकता. उत्तर देताना नैसर्गिकपणे तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक टाका.

quora

लक्षात ठेवा, स्पॅम करू नका. चांगली आणि उपयुक्त माहिती दिली तर वाचक तुमच्या ब्लॉगवर क्लिक करून येतात.

8. रेडिट वर प्रमोट करा (Promote on Reddit)

Reddit ही फार लोकप्रिय आणि थोडी वेगळी वेबसाईट आहे. इथे तुम्ही सुरुवातीला प्रोफाइल तयार करा, उपयोगी पोस्ट्स करून कर्मा (karma) मिळवा.

reddit ap

मग योग्य सबरेडिट्समध्ये (Subreddits) सामील व्हा आणि नैसर्गिकरित्या ब्लॉग प्रमोट करा. इथे थेट लिंक टाकणं टाळा, आधी विश्वास संपादन करा.

9. इतर ब्लॉग्सवर गेस्ट पोस्ट करा (Guest Posting)

गेस्ट पोस्टिंग ही ट्रॅफिक वाढवायची एक जुनी पण प्रभावी पद्धत आहे. तुम्ही तुमच्या विषयाशी संबंधित दुसऱ्या ब्लॉगवर लेख लिहा.

guest posting

त्यातून तुम्हाला एक चांगला बॅकलिंक मिळतो आणि ट्रॅफिकही मिळतात. गेस्ट पोस्टसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात किंवा बदल्यात तुमच्या ब्लॉगवर गेस्ट पोस्ट ऑफर करू शकता.

10. पुश नोटिफिकेशन्स वापरा (Push Notifications)

ईमेल यादीप्रमाणेच, पुश सब्सक्रायबर्स (push subscribers) गोळा करा. तुम्हाला तात्काळ ट्रॅफिक मिळेल आणि तुमचा ब्लॉग गूगल डिस्कव्हरवर (Google Discover) येण्यास मदत होईल.

push notifications

वापरकर्त्यांना त्यांच्या फोन किंवा डेस्कटॉपवर थेट सूचना मिळेल. वनसिग्नल (OneSignal), पुशएंगेज (PushEngage) सारख्या प्लॅटफॉर्म वापरून पुश नोटिफिकेशन्स सेट करू शकता.

11. WhatsApp ग्रुप किंवा चॅनेल तयार करा

WhatsApp आज प्रत्येकाच्या हातात आहे. तुम्ही स्वतःचा WhatsApp ग्रुप किंवा नवीन चॅनेल तयार करा आणि तिथे ब्लॉग पोस्ट्स शेअर करा.

whatsapp messaging

वाचकांशी थेट संपर्कात राहिल्यास त्यांचं लक्ष तुमच्या नव्या पोस्ट्सकडे लगेच जातं आणि ट्रॅफिक वाढतो. तुमचा ब्लॉग गूगल डिस्कव्हरवर येण्यास मदत होईल.

12. Medium वर पोस्ट करा

Medium ही एक फ्री आणि लोकप्रिय वेबसाईट आहे जिथे तुम्ही तुमचे ब्लॉग पोस्ट्स पुन्हा पब्लिश करू शकता. त्यामुळे नवीन वाचक तुमचं लिखाण वाचतात आणि तुमच्या मुख्य ब्लॉगवरही भेट देतात. Medium वरून भरपूर नवं ऑडियन्स मिळवता येतं.

13. पेड जाहिराती (Paid ads) चालवा

Paid Ads चालवून तुम्ही तुमचा ब्लॉग हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. Google Ads किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे खर्च करून टार्गेटेड वाचक आणता येतात.

paid ads

पण यात खर्च जास्त होतो, म्हणून सुरुवातीला थोडं सावध राहून निर्णय घ्या. तुम्ही केवळ पैसे गुंतवण्यापूर्वी ब्लॉगची किंमत आणि इतर मोफत मार्ग वापरून पाहा.

14. Telegram चॅनेल तयार करा

WhatsApp चॅनेलप्रमाणेच, टेलिग्राम चॅनेल तयार करा. Telegram वरही लाखो लोक असतात. तुम्ही स्वतःचा टेलिग्राम चॅनेल तयार करा आणि तुमचे ब्लॉग पोस्ट्स शेअर करा.

telegram

इथे वाचक थेट नोटिफिकेशनद्वारे अपडेट होतात. त्यामुळे ब्लॉगवरील ट्रॅफिक वाढवायला ही खूप चांगली ट्रिक आहे.

15. फोरम्समध्ये शेअर करा (Share in Forums)

तुमच्या ब्लॉग विषयाशी संबंधित फोरम्स (forums) जॉइन करा, जसं की टेक्निकल, हेल्थ, ट्रॅव्हल वगैरे. फोरममध्ये सक्रियपणे सहभाग घ्या, लोकांच्या प्रश्नांना मदत करा.

Online forums

योग्य वेळी तुमच्या ब्लॉगची लिंक नैसर्गिक पद्धतीने शेअर करा. तुमच्या ब्लॉगमध्ये जर मूल्यवान माहिती असेल तर ते नक्कीच भेट देतील. हे करताना स्पॅम करू नका.

शेवटचे शब्द

ब्लॉगवर ट्रॅफिक आणायला थोडा वेळ आणि मेहनत लागतो, पण तुम्ही योग्य पद्धतीने काम केलं तर नक्की यश मिळतं. वरील सगळे मार्ग सोपे आहेत आणि तुम्ही लगेच सुरू करू शकता.

सुरुवातीला रोज थोडा वेळ देऊन या पद्धती वापरा आणि सातत्य ठेवा. हळूहळू तुमचा ब्लॉग वाढायला लागेल आणि वाचकांची संख्या देखील वाढत राहील.

Share:
Sankalp Bhagat
Sankalp Bhagat

मी संकल्प भगत, एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे, आणि मला ब्लॉगिंगमध्ये ७+ वर्षांचा अनुभव आहे. मी वर्डप्रेस आणि SEO या क्षेत्रात खास काम करतो. इथे तुम्हाला माझ्या संपूर्ण ज्ञानाचा अनुभव वाचायला मिळेल.